Posts

Showing posts from December, 2012

छंद

नभ काळे रिमझिम पाऊस पावसाच्या सरी सरींच्या धारा धारांतील थेंब थेंब मातीत मातीला सुगंध हृदयाचे बंध ! बंध, तुझा छंद छंद, तुझा चेहेरा चेहेरा, तुझ्या नजरा नजरेत तुझी आठवण आठवणीत स्मित स्मित जगण्यासाठी जगण्यासाठी सहवास सहवास तुझा आजही ! आजही नभ काळे रिमझिम पाऊस पावसाच्या सरी...

बगावत

बगावत करती है सांसे, आहें तेरे नामसे भरकर और फिर भी जिन्दा हूँ, क्या मैं भी बागी हूँ ? सिमट जाते हैं दिनमें निग़ाहों के दायरे भीड़ के हर शरीरपर एक ही चेहरा देखता हूँ सिर्फ तुम्हे जानता हूँ, क्या मैं भी बागी हूँ...? रोज़ एक नया दिनसा लाऊ कहाँ से मैं बीते लम्होंसे नए दिन का आगाज करता हूँ सिर्फ तुम्हे जीता हूँ, क्या मैं भी लम्हा हूँ...?

भावना

हृदयातल्या भावना आणि त्या भावनांचं विश्व कुणालाच दिसणार नाही, हे ती जाणते  ती हे जाणते, पण त्या भावनांना मात्र नजरतीरांवर राहायला आवडते 'त्या' येतात तेव्हा ती चोरते नजर नजरेला लावून पदर सजवते निर्जीव देखावे...! पण, त्या देखाव्यातला पक्षी जागेवरच उडतो, हे ती जाणते? त्या भावनांचा संसार तिला दिसत नाही दूरवर आणि तरीही जाणवते तिच्या नजरेतली थरथर...   ती मिटवू पाहतेय प्रश्न सगळे आणि उत्तरही तिला नकोसे वाटते...! - ५-१०-१९९९ ला लिहिलेली एक कविता....

एका सेकंदाचं आयुष्य

नाकाच्या देठावर आलेला श्वास आत घेणार इतक्यात... तो पुन्हा हवेत विरला! श्वास म्हणाला, 'तू जगणार चार दिवस म्हणून करतोस मजा आयुष्यभर बेफाम, बेलगाम, बेगुमान अन आयुष्यभराची मस्ती मृत्युशय्येवरही टिकते 'अखेरची इच्छा' म्हणून ! पण अति होतंय आता, तुझ्या चार दिवसांच्या आयुष्याला माझा क्षणा क्षणाचा श्वासाधार घेत तू मरेपर्यंत जगशील आणि एका सेकंदाचं आयुष्य मी क्षणिकही जगायचं नाही...?

काळीज खुणा

कधी शहारतात कधी बहरतात अंगावरच्या आनंद खुणा रुंजी घालतात सतत मनात न विसरणाऱ्या पाऊल खुणा ओठांवरही अवखळ रुळतात तुझ्या माझ्या शब्द खुणा आतुर नजरांना आठवतात आपल्यामधल्या खाणा खुणा क्षितिजावर रोज मावळतात हलक्या नाजूक स्पर्श खुणा सर्व दिशांना उगवतात मन जाळणाऱ्या सूर्य खुणा काही माणसं जवळतात सावल्यांत घेऊन शापित खुणा का आधार देऊन दुरावतात हृदयात ज्यांच्या काळीज खुणा...?

लकीरें

निगाहें चेहेरेमें बैठी रहेती हैं जानती हैं उफक पर पुराना हैं चाँद रास्तों को बिछाये सदिया गुजर गयी क्यों लकिरोंको छेड़कर कोई मुस्कुराया आज तनसे तनहाईयोकि चादर लपेटे वक्त था लेहेरोंने छुई रेत, किनारा फिरभी सख्त था परछाई पेहेनके निकलता हूँ अंधेरोंमें मस्त मैं यूँ तिनका जलके दिनमें घुला निखर गया आज क्यों लकिरोंको छेड़कर... सजाये रोज ख्वाब और घरसे दूर रखता गया कैसे मिले अपना कोई शहरसे दूर चलता रहा होठोमें लफ्ज चुभते रहे खुद एक पैगाम बन गया कोई मुद्दतों पढ़कर मुझे, पहेली सुलझा गया आज क्यों लकिरोंको छेड़कर...

अख़बार

अख़बार के हर एक पन्ने पर मुद्दा कोई संजिदासा पढ़के खबर हर एक मगर सियाही के जैसे बिखरसा कुछ मर गए, मारे गए, कुछ पैसों के फेरफारसा सच भी कभी छपता मगर दो लफ्जोंमें लपेटासा बाजार में सजता गया हर जेब का रंग होलिसा खेतों में और मरते रहे, न उगले जमीं कुछ सोनेसा सियासत ने भी जब मूह खोला, लगता उन्हें साजिशसा तपता रहेगा दिन मगर लगता रहा बारिशसा न मनो इसे पर मनो भी हकीक़तसे मैं अन्जानासा किसीको अगर लगता नहीं कर सकता हैं ये अपिलसा खेलोगे तुम हारूँगा मैं कुछ बन गया दस्तुरसा संजीदगीसे कहता हूँ, तू भी बन गया अखबारसा

इतकाच प्रश्न उरलाय...

मी जो नव्हतो, तो मी व्हायचा प्रयत्न केला... आधी तर मी तुलाच प्रमाण मानून चालत राहिलो पण तू सुद्धा कुठेतरी सर्वस्व अर्पण करून..., शरणार्थी ! मी तुझा गुलाम, तू कुणाचा... आणि मग भरला बाजारच गुलामांचा ओझं तसंही जड असते मग जाणिवांचंच का असेना म्हणून ओढण्यापुर्वी जागवलं तिला तर जागृत देवस्थान असल्यासारखं मलाही मूर्तिमंत मानून, पुन्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचा एक कुटील डाव मांडला 'समजत नाही तर सोडून दे', असं कुठेच लिहिलेलं नसताना मनात शिलालेख कोरून काळे दगड पांढरे केले तरी शांती ह्यालाच म्हणतात हाही शिलालेख कुठेच नव्हता, त्या दगडांतून लाव्हा उसळेल आणि ती समज सुद्धा वितळून जाईल. ...समजत नाहीय...? एकदा प्रयत्न तर करून पहा प्रेमाचा खोल अर्थ सांगू पाहणारे सगळेच वासनेच्या खोल गर्तेत...! तुझ्या नजरेची भाषा कळते तशीच मला पाहणाऱ्या लोकांची नजरही कळते ती आधी तुझ्याकडे मग माझ्याकडे आणि परत... आणि वर्तुळ पूर्ण करते आपला नजर संवाद त्यात शाश्वत होता, हे जाणवतंय का तुला? कसं वागावं, हे सुद्धा आता आपण ठरवू लागलोयत परकेपणा 'आपलेपणात' भरला जातोय जमेल तितका त्या

रात्र

एक दुरावलेली रात्र सुन्न क्षितिजावर एकाकी सूर्यावर पहारा ठेवत रोज मला बिलगते एक दुखावलेली रात्र तिच्या असतात हजार वेदना तिला समजावण्याच्या नादात रोज क्षितिजावर उजाडते एक दुरावलेली रात्र एक दुखावलेली रात्र रोज मला बिलगते रोज क्षितिजावर उजाडते...

मनमुक्त

पर्वत, नद्या, झाडे, वेली, पक्षी, प्राणी, समुद्र, वारा, पर्जन्य, सारे निसर्गनिर्मितीसाठी आवश्यक असणारे अणू रेणू आणि ह्या सर्वांत प्रखर बुद्धिमत्ता लाभलेले आपण मानव प्राणी! निसर्ग आणि मानव यांच्यात संवाद साधण्याची कला विलक्षण आहे. त्या निसर्गाची भाषाही विलक्षणीय, सहज आहे. निसर्गाला भाषेचा आधार घ्यावा लागत नाही. पावसाचा पहिला थेंबही हितगुज करतो धरणीशी, आता मी तुझ्यात सामावलोय, होऊ देत नवनिर्मिती, तू हो पुन्हा सुजलाम सुफलाम. ती कुजबूज आपण कधीच ऐकू शकत नाही. ती भाषा आपणाला समजत नाही, तरीही त्या गर्भितार्थाची अनुभूती आपण अनुभवतो निसर्गाकडून. आणि आपण भाषाधार घेऊनसुद्धा एका कोड्यात वावरतोय. कदाचित ह्यातच सारं मर्म आहे. 'भाषा' असते मानवी जीवनातल्या 'व्यवहारी' पणासाठी. आणि मनाचा ठाव घेण्यासाठी, अंत:करण निरखण्यासाठी वा एकांतात देखावे रंगवण्यासाठी फक्त 'शब्दच' मदत करतात. तेव्हा आपल्याला हवं असतं फक्त हितगुज, मनांची कुजबूज, अलगद साधावा संवाद कुणाशीही, द्यावी सुखा - दु:खाची, यशापयशाची, गुणदोषाची, होत्या नव्हत्याची, चांगल्या वाईटाची अनुभूती आणि तिथेच गवसते कविता