Posts

Showing posts from July, 2013

हृदयास छंद जळण्याचा

क्षणिक सहवास… …कुणाचा निरागस उपहास …विरहाचा अधांतरी आधार…  …अंधाराचा उन्माद तुलाही… …दुरावायचा जपलेला… …गंध फुलांचा उरलेला… …बंध गुंतण्याचा रंगलेला… …रंग जखमांचा शमलेला… …साथ जन्माचा पायात… …चाळ प्रेमाचा बेधुंद… …स्पर्श काफिराचा ओठांत… शब्द… प्रियेचा कैफास… आस… फितुराचा हृदयास… छंद… जळण्याचा!

मनाची सुधारीत आवृत्ती

सुरुंग वाटेत पेरून रोज घरी परततो संकटाची पावलेही जड असतात…, ऐकल्यापासून घर कधीतरी छावणी, कधी शत्रूही सोबत राहतात. सुखा दुःखाची चढाई एकमेकावर केव्हाही शांतीचा आग्रह धरत, माझाच बळी देत मी दोघांचंही अस्तित्व नाकारतो…, कारणमीमांसा करतो तर हजारो वर्षांपूर्वीचं कुणाचं हास्य कानी पडतं…! माझंच सारं जीणं नादुरुस्त असेलसं समजून घराबाहेर पडलं तर 'संध्याकाळी लवकर घरी याल' म्हणत, माझ्या सावलीत आणि एक स्त्री देह वावरतो परिस्थितीची सदैव जाण करून देत ती मोकळं करते मला… तिचाही संसार ती माझ्यातच पाहते! चेहेऱ्याच्या सर्व स्नायुंना आनंद विकाराचा झटका देत माझं खोटं हास्य तिच्या गळी उतरवत, पाय उतार होतो… 'दिलको बेहेलाने के लिये' वगैरे वगैरे आठवत गालिब सारखे दोन - चार जणं प्रवासात सोबत करतात. अवैध संपत्ती जप्त करतात अगदी तसंच या प्रश्नांचही होऊ शकते का? हा क्रांतिकारी विचार लोकसभेत शुन्य प्रश्नोत्तर काळात चर्चिला जाऊ शकतो का? इतकं मन काव्यात्मक होऊन जाते… अर्थात ३६ रुपयांत गरिबी संपवता येऊ शकते हाही आधार असतो त्या विचारला. कुत्र्याने अंग झटकाव तसं स्वप्नही झटकते मला

काय वेगळं काही…

आवरून घे स्वतःला सकाळ होण्यापूर्वी कुठेतरी मोकळं होऊन उन, वारा, पाऊस काहीतरी नाहीच तर रोजची खरडेघाशी… आणि जीवन म्हणजे काय वेगळं काही? हातात उरलेला मळ, तोंडात फसलेला गळ! इथून तिथून माणसं आरपार फिरत जातात मन तर तसही अदृश्य, वरून जबरदस्ती नसतेच की समजून घे मला व्यवहार तरीही होतोच खरेदी - विक्रीचा आणि जग-रहाटी म्हणजे काय वेगळं काही? विरह…, न मिळालेल्या सर्व इच्छांचा 'तू जवळ नसावी' ही पण असेल, 'अडचण' पण काही चीज असावी की इथे सांगू शकत नाही अशी सुद्धा…! तरीही असणं - नसणं म्हणजे काय वेगळं काही? ठरलाच तर मोह, उरलाच तर डोह…!