Posts

Showing posts from January, 2013

खेळ

चल, एक खेळ खेळूया घरी जा, नि सावली घेऊन ये मी माझ्या केसांच्या जटात मावेलसा दगड निवडते गोफणासाठी नंतर परत तू लगेचच कावळा बनून अवतरायचं नाही आकाशातून ! पीकांवरून सावली मात्र हलली पाहिजे. जटांनीच मी बांधून ठेवीन तुला बुजगावण्याच्या मडक्यावर चोच मारण्यासाठी अन तुला माहित आहे मला सहन होत नाही टक टक मग मात्र तुझ्या कानफटावर आवाज होईल दगड लागेलच तुला, त्याची चिंता नको पण मडक्याला दगड लागला, वा रक्त सांडलं तुझं..., तर तिथेच खेळ संपवीन मी...!

नन्हे हाथोंकी नन्ही लकीरें

नन्हे हाथोंकी नन्ही लकीरें धुल रही हैं नसीब अपना हमींसे है बर्बाद ये और कहेते है भारत है कल का मासूमियत फुलोंसी है गालोंपे है हर दिल फ़िदा चमकीं रहे किस्मत तेरी जैसे जूता किसी गैर का खिलता रहे नन्हा चमन दुखका मिटे नामो निशान आंखोंमें सजते ख्वाब हो हाथोंमे लिए बेचे तिरंगा फैलाते नन्हे हाथ भी चाहे करे मजदुरियां नौकर कोई रखता उन्हें यहाँ जिस्मों के बाजारसा

कला

तलवारीच्या म्यानेत बंदीस्त उद्या येणारा माझा दिवस आतल्या आताच तीक्ष्ण धारेने दिवसाचे चार भाग करतो मी मग्न, म्यानेवर नक्षी कोरतो. इतक्यात कुणीतरी तलवार उपसून एका देहाला दोघांत वाटतो शस्त्राधारी ओठं नुसतीच हलतात   शब्द कुणीतरी मागून भरतो. तलवारींच्या आवृत्या वाढत जातात प्रेतांची प्रतिकृती रेखाटली जाते आणि कला लोकप्रिय होऊ लागते ! जात, धर्म, समाज, वर्णाचा कुणीही सहज जन्माला घालतो कुणाचाही तिरस्कार बेसावध क्षणाला. तशातच उमलवू पाहतोय दूरवर प्रेमाचा अंकुर..., कुणी उलट्या काळजाचा ! प्रेयसी मात्र मिठीत विसावून मिलनाच्या दिवसाचं निमित्त जाणते 'तो आपल्याच धर्मातला, खालच्या जातीचा' उद्रेकाला तोपर्यंत काळ दाबतो अन तापवतो हळुवार प्रेम लाव्हा... 'धारेविनही मनं कापली जातात...!' जुन्या कलेला तिनं पैलू पाडला

सामान्य

सामान्य दिवस, सामान्य सुर्य सामान्य जीवनातलं सामान्य जगणं सामान्य शब्दांवर सामान्य भावना सामान्य जाणिवांचं पिक सामान्य सामान्य गर्दीतलं सामान्य चिरडणं सामान्य ओळखींना स्मित सामान्य सामान्य चोऱ्या, सामान्य दंगली सामान्य धर्मातले संन्यासी सामान्य सामान्य विचार, विरोध सामान्य सामान्य दहशतीला शरीरं सामान्य सामान्य वासना, सामान्य कर्म सामान्य मरणाला स्वर्ग सामान्य जातिभेद सामान्य, सामान्य वर्णभेद सामान्य दगडांचे देवत्व सामान्य. सगळीच शिरं इथेच झुकतात म्हणून देवाचा आधार अर्थहीन घेतो क्रुसावर चढून चांदणी निरखतो कुणी गौतमाची तत्व त्रिशुळाने गिरवतो अहिंसा, प्रेम, वगैरे गळ्यात अडकवून चार खांद्यावर जगभर मिरवतो. चार खांद्यामागून अनुयायी निघतात वेगळ्या दिशांनी वेगळ्या देशाला अन खान्द्यांवरचा 'मी' दिसत नाही म्हणून देव म्हणून आकाशात डोळे गाडतात! सामान्य भक्त, प्रार्थना सामान्य सामान्य मागण्या, स्वार्थ सामान्य सामान्य यात्रा, सामान्य जत्रा सामान्य वाद्यांचा नाद सामान्य सामान्य अवतार, कोप सामान्य सामान्य ठिकाणच्या श्रद्धा सामान्य सामान्य धर्मांचा प्रसार सामान्य

स्वप्नांचा काफिला

रात घेउनी साथीला । बेगडी स्वप्नांचा काफिला । सरकतो डोळ्यांतून संथ । नजरभर जाग ।। पाणी ओले चंद्रबिंब । मोजायचा थेंब थेंब । अर्थामागे अर्थ एक । सारा भास ।। उसळतो सागर पदरात । उकळतो श्वास देहात । विव्हळते बाहुली नजरेत । ठाव कुणास ।। चित्रमय उत्सव उधळून । काजवे चांदण्यात सजवून । रातभर आनंदी आनंद । केवळ मनात ।। सजवतो दु:खाची झालर । बरसतो कल्पनांकित पाउस । अधुऱ्या इच्छांचा हौदोस । वास्तव उदास ।। सर्वदूर थकलेला प्रवास । अधुरी चारही दिशांतर । उरभर उरलेली आस । बदलावी कूस ।।

थेंब

थांब... थेंब थांबला पाण्यावरती ओढून रेष अश्रू... एक ढाळला त्यानं होताना नाहीसे ठेवली... जपून पानाने तनूवर ती मर्म रेष सांग... कोण संपला या मातीच्या कुशीमध्ये

आस

पैलतीरी पावलांचा साद ऐकतो कुणी श्वास एक संपतो नि स्तब्धता पानोपानी कोण एक जागतो का भंगतो उद्यावारी आज असा गोठलेला, कालही मेला कधी स्पर्श असा कोण तो ? हवा हवासा आजही आवाजही न ऐकला ना बोललो कोड्यातही प्रश्नात चिन्ह पेरता विचारतो कधी कधी का जन्म घालतो मला ? मी संपतो प्रश्नचिन्हि ! खोलात एक ठेवतो मी वृद्ध अशी सावली ओठात शब्द साचले वयात आली सुरकुती अनुभव कशात ठेवला न आठवे अद्यापही सध्यातरी न पाहिला चेहेरा कुणी अनोळखी हा कोण तू, हा कोण मी, सांगू कुणा कुणास मी छंद हजार शोधतो, भांडू कशा कशात मी एका रेषेत सांगतो, थांबेन रेषे शेवटी वळणा वळणांनी गाठ तू, न आस पुनर्जन्मीची...