एका सेकंदाचं आयुष्य

नाकाच्या देठावर आलेला श्वास
आत घेणार इतक्यात...
तो पुन्हा हवेत विरला!
श्वास म्हणाला,
'तू जगणार चार दिवस
म्हणून करतोस मजा आयुष्यभर
बेफाम, बेलगाम, बेगुमान
अन आयुष्यभराची मस्ती
मृत्युशय्येवरही टिकते
'अखेरची इच्छा' म्हणून !
पण अति होतंय आता,
तुझ्या चार दिवसांच्या आयुष्याला
माझा क्षणा क्षणाचा श्वासाधार घेत
तू मरेपर्यंत जगशील
आणि एका सेकंदाचं आयुष्य
मी क्षणिकही जगायचं नाही...?

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य