Posts

Showing posts from June, 2013

अवती भोवती माझ्या

तुझ्या हसण्यात कोडे असते नेहमीच तु सांगशील…, पण खोटं, हे ही मी जाणतो अवती भोवती माझ्या, तु रुतलेली असतेस केव्हाही पण तुला नको असलेल्या आणि हव्या असलेल्या गोष्टी तु एकाच पानावर लिहितेस… गोंधळ दोघांचाही होतो…! 'मला तु हवीय', मी अर्थ लावतो 'तु नकोस मला', तु अर्थ लावते... अवती भोवती माझ्या, तु रुतलेली असतेस तेव्हाही…!

नाईलाज असाही असतो !

'मी कवेत आसमंत घेतलाय' तिला हे ठाऊक होतं, मी खोटं बोलतोय तरीही तिचा स्वप्नपंखी मनपाखरू माझा आसमंत चिरत होता मला माहित होतं, स्वप्न ऊंची होतं…! नाईलाज असाही असतो ! कालच जेलमधून सुटलो खोटं बोलण्याचा आरोप होता खरं बोलण्याची सवय कधीच मोडलेली कारण कुणाचंही मन मोडणं पुन्हा गुन्हा होतो. नाईलाज असाही असतो ! परवा रात्री रस्ता क्रमांक ४ खोदला नवीन गेस पाईप लाईन टाकली रस्ता पुन्हा डांबरने झाकला कंत्राटदार बदलला, काम बदललं गेस पाईप लाईन मधूनच इलेक्ट्रिक लाईन द्यायचं ठरलेलं. नाईलाज असाही असतो ! कुठल्यातरी समारंभात भयानक आग लागलेली कळलं, कुणातरी मंत्रीचं भाषण होतं विषय होता, 'भारत महासत्ता होणार!' प्रश्नच नव्हता, ३२५ जणं पूर्णपणे जळून गेलेली ओळख पटवणं केवळ अशक्य आणि डिएनए रिपोर्ट कुणाचाही नव्हता! सामूहिक अन्त्यसंस्काराचं उत्तर तयार होतं. महासत्ता होण्यासाठी हजारो हात तत्पर होते. नाईलाज असाही असतो ! अजूनही तू तुलाच जगवतो मी मलाच जगवतो मी श्वास घेऊन सोडलेल्या उच्छवासावर तू अवलंबून असतो. नाईलाज असाही असतो ! शब्दात सापडलेल्या अर्थाच्या बाह