Posts

Showing posts from October, 2013

रामा तुझ्या नशिबी । पुन्हा वनवास ।।

ते सारेच रामभक्त । असे देशभर रक्त । वाहते तरी कितीदा । राम मंदिरासाठी ।। कुणी चेतविली रथयात्रा । ६ डिसेंबर रंगला । रक्तोत्सव ऋतु बहरला । कोण सुडापायी ।। न वाहिला थेंब । जो होता लालकृष्ण । ते सारे कृष्ण कृत्य । फक्त निष्पापांसाठी ।। कापुनिया कान - नाक । ऐकू येईना विव्हळणं । उमजेना रक्त दर्प । राम - शुर्पणखा ।। खंजीर पाठीत मारला । कसा विश्वास कुणाचा । रामा, तुझाच कित्ता । बालिचा वध ।। जगण्याची इच्छा फार । म्हणुनी हाती तलवार । उभा ठाकला समोर । पैगंबर धर्म ।। किती ठेवावा हिशोब । किती विखुरली घरं । किती धडावेगळी शीरं । साऱ्या देशभर ।। १२ मार्च उजाडला । १३ स्फोटांनी बिथरला । जीव घेणा खेळ पुन्हा । अयोध्येचा सूड ।। त्या उजाड जागी । प्रश्न अजूनही बाकी । नाही मंदिराची खुण । पाडूनही मस्जिद ।। येता निवडणुकीचा काळ । पुन्हा 'होणारं, होणारं' । मंदिराचा जुना हार । नव्या सत्तेसाठी ।। परवा जाळला डबा । किती विव्हळला गळा । अन देह उरला । राखे जैसा ।। जाळूनी अठरा पुरुषं । संगे स्त्रिया पंचवीस । कोवळी पंधरा बालकं । सारे कारसेवक ।। तोच खेळ पुन्हा । पुन्हा तोच खेळ