भावना

हृदयातल्या भावना
आणि त्या भावनांचं विश्व
कुणालाच दिसणार नाही, हे ती जाणते 

ती हे जाणते, पण त्या भावनांना मात्र
नजरतीरांवर राहायला आवडते
'त्या' येतात तेव्हा
ती चोरते नजर
नजरेला लावून पदर
सजवते निर्जीव देखावे...!
पण, त्या देखाव्यातला पक्षी
जागेवरच उडतो, हे ती जाणते?
त्या भावनांचा संसार
तिला दिसत नाही दूरवर
आणि तरीही जाणवते
तिच्या नजरेतली थरथर...
 

ती मिटवू पाहतेय प्रश्न सगळे
आणि उत्तरही तिला नकोसे वाटते...!

- ५-१०-१९९९ ला लिहिलेली एक कविता....

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य