रात्र

एक दुरावलेली रात्र
सुन्न क्षितिजावर एकाकी
सूर्यावर पहारा ठेवत
रोज मला बिलगते

एक दुखावलेली रात्र
तिच्या असतात हजार वेदना
तिला समजावण्याच्या नादात
रोज क्षितिजावर उजाडते

एक दुरावलेली रात्र
एक दुखावलेली रात्र
रोज मला बिलगते
रोज क्षितिजावर उजाडते...

Comments

Popular posts from this blog

मनाची सुधारीत आवृत्ती

गहराई

हे आपण कुठे ऊभे आहोत?