छंद

नभ काळे
रिमझिम पाऊस
पावसाच्या सरी
सरींच्या धारा
धारांतील थेंब
थेंब मातीत
मातीला सुगंध
हृदयाचे बंध !
बंध, तुझा छंद
छंद, तुझा चेहेरा
चेहेरा, तुझ्या नजरा
नजरेत तुझी आठवण
आठवणीत स्मित
स्मित जगण्यासाठी
जगण्यासाठी सहवास
सहवास तुझा आजही !
आजही नभ काळे
रिमझिम पाऊस
पावसाच्या सरी...

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य