काळीज खुणा

कधी शहारतात कधी बहरतात
अंगावरच्या आनंद खुणा
रुंजी घालतात सतत मनात
न विसरणाऱ्या पाऊल खुणा
ओठांवरही अवखळ रुळतात
तुझ्या माझ्या शब्द खुणा
आतुर नजरांना आठवतात
आपल्यामधल्या खाणा खुणा
क्षितिजावर रोज मावळतात
हलक्या नाजूक स्पर्श खुणा
सर्व दिशांना उगवतात
मन जाळणाऱ्या सूर्य खुणा
काही माणसं जवळतात
सावल्यांत घेऊन शापित खुणा
का आधार देऊन दुरावतात
हृदयात ज्यांच्या काळीज खुणा...?

Comments

Popular posts from this blog

मनाची सुधारीत आवृत्ती

गहराई

हे आपण कुठे ऊभे आहोत?