Posts

कोडं सुटलं म्हणून…!

गहनतेच्या खोलात, कुणी आणि का जावं? शास्त्रज्ञांच्या मनाची खोल तयारी जग संपणार म्हणून. पण मला त्याची चिंता नाही मी संपणार, त्यानंतर…? गहनतेच्या खोलातून लांब उडी मारुन शास्त्रज्ञ नाचले म्हणतात कोडं सुटलं म्हणून…!

पाऊस येत राहतो

तु   दुरवर   रहा जवळीकतेतून   दोष   दिसू   लागतात दिसून   दुर्लक्ष   करण्या   इतपत चांगलं   न्   वाईट   ठरवताना निवड   चुक   ठरते श्वास   मिळतो   तसा गंज   ही   लागतो   शरीरातल्या   लोहाला रोजनिशी   रोज   लिहीणारा मानसोपचार   काय   घ्यायचा हे   कागदावर   उतरवतो निरीक्षणानुसार   ईलाज   नाही   करत कठिण   वेळ   निर्णय   घेऊन इतिहासात   जमा   होऊ   दे वेळ   सांगेल   परिणाम चाणाक्ष   बुद्धीला ८   तास   झोप   लागते नमरत   तोवर   ठिकाणावर   रहायला कोण कुठल्याक्षणी   मोहाचा   भाग   होईल धक्का   लावेल   स्थितप्रज्ञेला निर्णयक्षमतेला थेंबांनी   खुलवलेल्या   हिरवळीवर चालत   रहा पहिल्या   पावसातही   पूर   येतो … पाऊस   येत   राहतो !

परतणाऱ्या लाटा

ती त्याला समुद्रकिनारी घेऊन गेली खोल पाण्यात परतणाऱ्या लाटा दाखवायला तो दचकला... किनाऱ्यावर खेळणाऱ्या लाटा आता तिला आवडत नसतील की संपलंय आपल्यातलं सर्व काही हे सांगायची तिची ही पद्धत असेल... तशात सूर्य उदास  मागे पुढे ढगांचा पसारा नाही सोडून सगळेच जातात म्हणून आपण अपवाद नको हे सुचवायचंय तिला...? हातात हात न घेता सारे मोकळे फिरत आहेत चणेवालाही संशयग्रस्त निरखतोय आज चणे का नकोसे झालेत मन तयारी सुरू झाली झालेल्या चुकांची गोष्ट काढायची नाही पक्क ठरवलं... पण नाही ठरलं हिशोब कसला नी कुठला मागेल  हे नाही ठाऊक गंभीर आजार वगैरे..., गंभीर तर वरचं वर्णन पण आहे. क्षणात होत्याचं नव्हतं झालं हे आजच्या काळात नॉर्मल आहे. ती नाही बोलली तोवर काही वादळ समुद्रातच तयार होतात आता मी तिच्यापासून दूर चालतोय ‘ हे आज आपण इतके उदास का?  मला सुरवातीलाच समजलेलं... ती म्हणाली, मला मात्र पटवून दिलं... कोण जातं परतणाऱ्या लाटा पाहायला? गर्दीत सामील होत हातात हात समुद्राचं क्षितिज सोडून आम्ही शहराच्या दिशेने निघालेले … दूर शहराच्या पलीकडेही क्षितिज आहे...

आणि पुन्हा...

कुणी  होकार दिलाय, तो काव्यात रमलाय. भंग स्वप्नांचा होतोय जागेपणी सहवास नसलेल्यांचा होतो नसतांनाही दुरावा...? मग होकाराचा शोधे संबंध कारण असेलच, पण हवंय का! निस्सीम प्रेम म्हणत कुणी जगत असेल जगात विवर जे शोधतात ते देतील भाड्यावर की  मलाच पाठवतील वर आकाशात... ती मोकळं झाल्याचं सांगते स्वतःला मनात तिच्या मनात अविरत भटकतो सुटका हवी क्षणभर  थांबला असता ढग वरती थेंब गालावरून तुझ्या  नदी, समुद्र नी ढगात आणि पुन्हा...

सुंदरता

सुंदरता घर कुरकुरतय बिजागरात तेल ओत मी काडी लावतो विरोधी विचारांना भला मोठा अवरोध उफाळून येतो हिरोशिमा घरातून दिसतो. एका घरात राहून एक भक्कम भिंत हिमालयासारखी उभी मन मोहक, पण दुभंगलेली, हीन मनाची... तुला क्रूर म्हणायचंय का? तुझं दुःख अधिक गहिरं असेल मग! कोरोना महामारीत नष्ट व्हावेत ह्या जहाल विचारात तुला कुरूपता दिसत नाही? कुरूपता उरलेल्या लोकांत तुझी सुंदरता कुणास दिसेल?

मनाकाशी

नकोसं असं रोज सापडतच मोह!!! अनावर अमर खरा तोच मर्त्य!!!  तु सत्य झाकून ठेव उघड्यावर!!! अव्हेर जमतो सोयच आपलीशी कुणासाठी!!! द्वंद्व अविरत घिरट्या उदंड मनाकाशी!!! तिथे जेव्हा जाशील अनंत उरेल???

परग्रहवासी

वातावरणाच्या बाहेर फेकीन म्हणतो तुला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जर कामी येणार नसेल झोपेतही कुस बदलून, उपद्व्यापी उसळतात जे वर गेलेत त्यांचं काही खरं नाही आता हात पाहून ज्योतिषाने घाम पुसला क्षणात मागच्या महिन्यात तोही, पडला होता घरात अरुंद गल्ली, अंधार घरात, माणसं फक्त सहा पाहुणा येता घरा, आम्हा सर्वांचा टपरीवर चहा संशयी नजर घेऊन वर फिरतात टेहळणी यान आईनं सांगितलं होतं, 'ही सोडून जाणार तुला' पाऊस, प्रेयसी, पेग..., ढगात, मिठीत, घशात सुखावेल कशात कोण? कुणी सांगत नाही आता!