परतणाऱ्या लाटा

ती त्याला समुद्रकिनारी घेऊन गेली
खोल पाण्यात परतणाऱ्या लाटा दाखवायला
तो दचकला...
किनाऱ्यावर खेळणाऱ्या लाटा
आता तिला आवडत नसतील की
संपलंय आपल्यातलं सर्व काही
हे सांगायची तिची ही पद्धत असेल...

तशात सूर्य उदास 
मागे पुढे ढगांचा पसारा नाही
सोडून सगळेच जातात
म्हणून आपण अपवाद नको
हे सुचवायचंय तिला...?

हातात हात न घेता
सारे मोकळे फिरत आहेत
चणेवालाही संशयग्रस्त निरखतोय
आज चणे का नकोसे झालेत

मन तयारी सुरू झाली

झालेल्या चुकांची गोष्ट काढायची नाही
पक्क ठरवलं... पण नाही ठरलं
हिशोब कसला नी कुठला मागेल 
हे नाही ठाऊक

गंभीर आजार वगैरे...,
गंभीर तर वरचं वर्णन पण आहे.
क्षणात होत्याचं नव्हतं झालं
हे आजच्या काळात नॉर्मल आहे.

ती नाही बोलली तोवर काही

वादळ समुद्रातच तयार होतात

आता मी तिच्यापासून दूर चालतोय

‘ हे आज आपण इतके उदास का? 


मला सुरवातीलाच समजलेलं...
ती म्हणाली, मला मात्र पटवून दिलं...

कोण जातं परतणाऱ्या लाटा पाहायला?

गर्दीत सामील होत
हातात हात
समुद्राचं क्षितिज सोडून
आम्ही शहराच्या दिशेने निघालेले
दूर शहराच्या पलीकडेही क्षितिज आहे...

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य