आणि पुन्हा...

कुणी 
होकार दिलाय,
तो काव्यात रमलाय.

भंग
स्वप्नांचा होतोय
जागेपणी

सहवास
नसलेल्यांचा होतो
नसतांनाही

दुरावा...?
मग होकाराचा
शोधे संबंध

कारण
असेलच,
पण हवंय का!

निस्सीम प्रेम
म्हणत कुणी
जगत असेल जगात

विवर
जे शोधतात
ते देतील भाड्यावर

की 
मलाच पाठवतील
वर आकाशात...

ती मोकळं
झाल्याचं सांगते
स्वतःला मनात

तिच्या मनात
अविरत भटकतो
सुटका हवी

क्षणभर 
थांबला असता
ढग वरती

थेंब
गालावरून तुझ्या
 नदी, समुद्र नी ढगात

आणि पुन्हा...

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य