सुंदरता

सुंदरता

घर कुरकुरतय
बिजागरात तेल ओत

मी काडी लावतो
विरोधी विचारांना

भला मोठा अवरोध
उफाळून येतो

हिरोशिमा घरातून दिसतो.

एका घरात राहून
एक भक्कम भिंत
हिमालयासारखी उभी
मन मोहक, पण
दुभंगलेली, हीन मनाची...

तुला क्रूर म्हणायचंय का?

तुझं दुःख अधिक गहिरं असेल मग!

कोरोना महामारीत नष्ट व्हावेत

ह्या जहाल विचारात
तुला कुरूपता दिसत नाही?

कुरूपता उरलेल्या लोकांत
तुझी सुंदरता कुणास दिसेल?


Comments

Popular posts from this blog

काळीज खुणा

मनाची सुधारीत आवृत्ती

गहराई