पाऊस येत राहतो

तु दुरवर रहा

जवळीकतेतून दोष दिसू लागतात

दिसून दुर्लक्ष करण्या इतपत


चांगलं न् वाईट ठरवताना

निवड चुक ठरते


श्वास मिळतो तसा

गंज ही लागतो 

शरीरातल्या लोहाला


रोजनिशी रोज लिहीणारा

मानसोपचार काय घ्यायचा

हे कागदावर उतरवतो

निरीक्षणानुसार ईलाज नाही करत


कठिण वेळ निर्णय घेऊन

इतिहासात जमा होऊ दे

वेळ सांगेल परिणाम


चाणाक्ष बुद्धीला

 तास झोप लागते

नमरत तोवर 

ठिकाणावर रहायला


कोण

कुठल्याक्षणी 

मोहाचा भाग होईल

धक्का लावेल स्थितप्रज्ञेला

निर्णयक्षमतेला


थेंबांनी खुलवलेल्या हिरवळीवर

चालत रहा


पहिल्या पावसातही पूर येतो

पाऊस येत राहतो!

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य