Posts

आणि पुन्हा...

कुणी  होकार दिलाय, तो काव्यात रमलाय. भंग स्वप्नांचा होतोय जागेपणी सहवास नसलेल्यांचा होतो नसतांनाही दुरावा...? मग होकाराचा शोधे संबंध कारण असेलच, पण हवंय का! निस्सीम प्रेम म्हणत कुणी जगत असेल जगात विवर जे शोधतात ते देतील भाड्यावर की  मलाच पाठवतील वर आकाशात... ती मोकळं झाल्याचं सांगते स्वतःला मनात तिच्या मनात अविरत भटकतो सुटका हवी क्षणभर  थांबला असता ढग वरती थेंब गालावरून तुझ्या  नदी, समुद्र नी ढगात आणि पुन्हा...

सुंदरता

सुंदरता घर कुरकुरतय बिजागरात तेल ओत मी काडी लावतो विरोधी विचारांना भला मोठा अवरोध उफाळून येतो हिरोशिमा घरातून दिसतो. एका घरात राहून एक भक्कम भिंत हिमालयासारखी उभी मन मोहक, पण दुभंगलेली, हीन मनाची... तुला क्रूर म्हणायचंय का? तुझं दुःख अधिक गहिरं असेल मग! कोरोना महामारीत नष्ट व्हावेत ह्या जहाल विचारात तुला कुरूपता दिसत नाही? कुरूपता उरलेल्या लोकांत तुझी सुंदरता कुणास दिसेल?

मनाकाशी

नकोसं असं रोज सापडतच मोह!!! अनावर अमर खरा तोच मर्त्य!!!  तु सत्य झाकून ठेव उघड्यावर!!! अव्हेर जमतो सोयच आपलीशी कुणासाठी!!! द्वंद्व अविरत घिरट्या उदंड मनाकाशी!!! तिथे जेव्हा जाशील अनंत उरेल???

परग्रहवासी

वातावरणाच्या बाहेर फेकीन म्हणतो तुला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जर कामी येणार नसेल झोपेतही कुस बदलून, उपद्व्यापी उसळतात जे वर गेलेत त्यांचं काही खरं नाही आता हात पाहून ज्योतिषाने घाम पुसला क्षणात मागच्या महिन्यात तोही, पडला होता घरात अरुंद गल्ली, अंधार घरात, माणसं फक्त सहा पाहुणा येता घरा, आम्हा सर्वांचा टपरीवर चहा संशयी नजर घेऊन वर फिरतात टेहळणी यान आईनं सांगितलं होतं, 'ही सोडून जाणार तुला' पाऊस, प्रेयसी, पेग..., ढगात, मिठीत, घशात सुखावेल कशात कोण? कुणी सांगत नाही आता!

उपदेश

जो पुढे गेला त्याला आपण जग मागे टाकल्याचा साक्षात्कार झाला नी तो मागे राहिलेल्या सोबत्यांना शहाणपणाचे उपदेश पाजू लागला मागे राहिलेला मित्र कमी पावलं... कमी सोबत... कमी शब्द... अशी काटकसर अमलात आणून पुढे गेलेल्या मित्राला इतकं पुढे जाऊ देतो की... मागे राहिलेला मित्र तुमचा प्रवास सुखकर व्हावा म्हणत आपल्या प्रवासाला निघतो... दुनिया छोटी नाही हा मोठा विचार डोक्यात मावत नाही नजरेस दिसत नाही जाणीव होत नाही पण... जो पुढे गेला त्याला आपण जग मागे टाकल्याचा इतका साक्षात्कार झाला जग त्याला मागे टाकू लागलं...!!!

मागे काय उरतय

एका रात्रीत लाखो लोकांच्या स्वप्नांचं गणित सुटेल ना सुटेल, माझा कच्चा विषय आहे तो किती दिवस आजवर झालेत, हे मोजू शकतो गुणांच्या गळतीला छिद्र हजार होती हातच्या वजाबकीला बोटं नव्हती मेंदूचा वापर ही तोवर भानगडच नव्हती मला मात्र तुला शब्दात पकडता येऊ लागलं लिहून ठेवा चोख, क्रम न त्याच्या रिती पाठ करून सवयीन जाईल सुद्धा भीती अर्थ समजून पुन्हा, गवसेल नवचं हाती कमी अधिक आलं गेलं, हिशोब ठेवतो कोण मोजून मापून जगतो, छोटं दिसते जग मागे काय उरतय अन् पुढे जातंय कोण?

आपण प्रेमात रहायलाच हवं...!

पावसाचे दोन थेम्ब अंगावर पडण्यापेक्षा 'ते दोन थेंब' घशाखाली गेले तर हवा तो देखावा उभा करू शकतात. पण ते अतृप्त राहील तरच छान तुझी आठवण इथेच सुरू नी इथच संपायला हवी थेंब अंगावर पडून भिजण्याचा आनंद दाटून आल्यावरच मिळेल... अव्यक्त मेंदूला इथेच आराम मिळतो सर्व अर्ध्यावरती सोडावं हे त्या शोकात्म नाटकासारखं वाटेल पण... आपण प्रेमात रहायलाच हवं...!