उपदेश

जो पुढे गेला
त्याला
आपण जग मागे टाकल्याचा
साक्षात्कार झाला
नी तो
मागे राहिलेल्या सोबत्यांना
शहाणपणाचे उपदेश पाजू लागला

मागे राहिलेला मित्र
कमी पावलं...
कमी सोबत...
कमी शब्द...
अशी काटकसर अमलात आणून
पुढे गेलेल्या मित्राला

इतकं पुढे जाऊ देतो
की...

मागे राहिलेला मित्र
तुमचा प्रवास सुखकर व्हावा म्हणत
आपल्या प्रवासाला निघतो...

दुनिया छोटी नाही
हा मोठा विचार
डोक्यात मावत नाही
नजरेस दिसत नाही
जाणीव होत नाही

पण...

जो पुढे गेला
त्याला
आपण जग मागे टाकल्याचा
इतका साक्षात्कार झाला

जग त्याला मागे टाकू लागलं...!!!

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य