आपण प्रेमात रहायलाच हवं...!

पावसाचे दोन थेम्ब अंगावर पडण्यापेक्षा
'ते दोन थेंब' घशाखाली गेले तर
हवा तो देखावा उभा करू शकतात.
पण ते अतृप्त राहील तरच छान

तुझी आठवण इथेच सुरू
नी इथच संपायला हवी

थेंब अंगावर पडून
भिजण्याचा आनंद
दाटून आल्यावरच मिळेल...

अव्यक्त मेंदूला इथेच आराम मिळतो

सर्व अर्ध्यावरती सोडावं
हे त्या शोकात्म नाटकासारखं वाटेल
पण...
आपण प्रेमात रहायलाच हवं...!

Comments

Popular posts from this blog

काळीज खुणा

मनाची सुधारीत आवृत्ती

गहराई