मागे काय उरतय

एका रात्रीत लाखो लोकांच्या स्वप्नांचं गणित
सुटेल ना सुटेल, माझा कच्चा विषय आहे तो
किती दिवस आजवर झालेत, हे मोजू शकतो

गुणांच्या गळतीला छिद्र हजार होती
हातच्या वजाबकीला बोटं नव्हती
मेंदूचा वापर ही तोवर भानगडच नव्हती
मला मात्र तुला शब्दात पकडता येऊ लागलं

लिहून ठेवा चोख, क्रम न त्याच्या रिती
पाठ करून सवयीन जाईल सुद्धा भीती
अर्थ समजून पुन्हा, गवसेल नवचं हाती

कमी अधिक आलं गेलं, हिशोब ठेवतो कोण
मोजून मापून जगतो, छोटं दिसते जग
मागे काय उरतय अन् पुढे जातंय कोण?

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य