छंद
नभ काळे रिमझिम पाऊस पावसाच्या सरी सरींच्या धारा धारांतील थेंब थेंब मातीत मातीला सुगंध हृदयाचे बंध ! बंध, तुझा छंद छंद, तुझा चेहेरा चेहेरा, तुझ्या नजरा नजरेत तुझी आठवण आठवणीत स्मित स्मित जगण्यासाठी जगण्यासाठी सहवास सहवास तुझा आजही ! आजही नभ काळे रिमझिम पाऊस पावसाच्या सरी...