आस

पैलतीरी पावलांचा साद ऐकतो कुणी
श्वास एक संपतो नि स्तब्धता पानोपानी
कोण एक जागतो का भंगतो उद्यावारी
आज असा गोठलेला, कालही मेला कधी

स्पर्श असा कोण तो ? हवा हवासा आजही
आवाजही न ऐकला ना बोललो कोड्यातही
प्रश्नात चिन्ह पेरता विचारतो कधी कधी
का जन्म घालतो मला ? मी संपतो प्रश्नचिन्हि !

खोलात एक ठेवतो मी वृद्ध अशी सावली
ओठात शब्द साचले वयात आली सुरकुती
अनुभव कशात ठेवला न आठवे अद्यापही
सध्यातरी न पाहिला चेहेरा कुणी अनोळखी

हा कोण तू, हा कोण मी, सांगू कुणा कुणास मी
छंद हजार शोधतो, भांडू कशा कशात मी
एका रेषेत सांगतो, थांबेन रेषे शेवटी
वळणा वळणांनी गाठ तू, न आस पुनर्जन्मीची...

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य