खेळ


चल, एक खेळ खेळूया
घरी जा, नि सावली घेऊन ये
मी माझ्या केसांच्या जटात मावेलसा
दगड निवडते गोफणासाठी
नंतर परत तू लगेचच
कावळा बनून
अवतरायचं नाही आकाशातून !
पीकांवरून सावली मात्र हलली पाहिजे.
जटांनीच मी बांधून ठेवीन तुला
बुजगावण्याच्या मडक्यावर चोच मारण्यासाठी
अन तुला माहित आहे
मला सहन होत नाही टक टक
मग मात्र तुझ्या कानफटावर आवाज होईल
दगड लागेलच तुला, त्याची चिंता नको
पण मडक्याला दगड लागला, वा
रक्त सांडलं तुझं..., तर
तिथेच खेळ संपवीन मी...!

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य