स्वप्नांचा काफिला

रात घेउनी साथीला । बेगडी स्वप्नांचा काफिला ।
सरकतो डोळ्यांतून संथ । नजरभर जाग ।।

पाणी ओले चंद्रबिंब । मोजायचा थेंब थेंब ।
अर्थामागे अर्थ एक । सारा भास ।।

उसळतो सागर पदरात । उकळतो श्वास देहात ।
विव्हळते बाहुली नजरेत । ठाव कुणास ।।

चित्रमय उत्सव उधळून । काजवे चांदण्यात सजवून ।
रातभर आनंदी आनंद । केवळ मनात ।।

सजवतो दु:खाची झालर । बरसतो कल्पनांकित पाउस ।
अधुऱ्या इच्छांचा हौदोस । वास्तव उदास ।।

सर्वदूर थकलेला प्रवास । अधुरी चारही दिशांतर ।
उरभर उरलेली आस । बदलावी कूस ।।

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य