सामान्य

सामान्य दिवस, सामान्य सुर्य
सामान्य जीवनातलं सामान्य जगणं
सामान्य शब्दांवर सामान्य भावना
सामान्य जाणिवांचं पिक सामान्य
सामान्य गर्दीतलं सामान्य चिरडणं
सामान्य ओळखींना स्मित सामान्य
सामान्य चोऱ्या, सामान्य दंगली
सामान्य धर्मातले संन्यासी सामान्य
सामान्य विचार, विरोध सामान्य
सामान्य दहशतीला शरीरं सामान्य
सामान्य वासना, सामान्य कर्म
सामान्य मरणाला स्वर्ग सामान्य
जातिभेद सामान्य, सामान्य वर्णभेद
सामान्य दगडांचे देवत्व सामान्य.

सगळीच शिरं इथेच झुकतात म्हणून
देवाचा आधार अर्थहीन घेतो
क्रुसावर चढून चांदणी निरखतो
कुणी गौतमाची तत्व त्रिशुळाने गिरवतो
अहिंसा, प्रेम, वगैरे गळ्यात अडकवून
चार खांद्यावर जगभर मिरवतो.

चार खांद्यामागून अनुयायी निघतात
वेगळ्या दिशांनी वेगळ्या देशाला
अन खान्द्यांवरचा 'मी' दिसत नाही म्हणून
देव म्हणून आकाशात डोळे गाडतात!

सामान्य भक्त, प्रार्थना सामान्य
सामान्य मागण्या, स्वार्थ सामान्य
सामान्य यात्रा, सामान्य जत्रा
सामान्य वाद्यांचा नाद सामान्य
सामान्य अवतार, कोप सामान्य
सामान्य ठिकाणच्या श्रद्धा सामान्य
सामान्य धर्मांचा प्रसार सामान्य
सामान्य युद्धांचं कारण सामान्य
सामान्य मीही...! दुर्लक्षितात सामान्य
सामान्य जगाचा निरोप सामान्य...

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य