पक्षांतर बंदी

 डोळेकानतोंड

ही तीन इंद्रिय

मुलभूत अधिकारात नाही येत

असं ऊद्या कानी पडलं तर

तर गांगरून जायचं कारण नाही.


तुम्ही मेंदू वापरू शकताबेलाशक

पण कुठे…? त्याचे नियम

माहिती अधिकारात ग्राह्य नसतील पण

विचार स्वातंत्र्याला हात नाही लावला

हे भक्तांना खुश करण्यासाठी


तू फक्त भारतीय असणं

हे जन्म दाखल्यावर “पक्ष” निवडल्यावर

जिथे त्या पक्षाचं सरकार असेल तिथून

१५ दिवसात घेऊन जावं लागेल

निरर्थक वाद नको

एका आत्मनिर्भर देशात जन्मलास तू आता


१५ चा उल्लेख

रूपयांशी लावता येणार नाही.

ध्यानी ठेव


चुकलास तर 

विरोधी पक्षांचं नागरिकत्व देऊन

त्या राज्यात रवानगी ही शिक्षा अमलात येईल

तिथं भारताचे नियम लागणार नाही

पक्षांतर बंदी इथे लागू होते

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

गालिब