नोंद

वेळ होता म्हणून थांबलो जरा 

तर

थांबलास म्हणत वेळ निघून गेली


जर

तर ची 

दुनियादारी

नव्हतीच मुळी

मन दुभंगलंय

सारंच हवंस झालंय

आहे

तरी सुटून जातंय काही


तुला आनंद

माझ्यापेक्षा जास्त

तुझ्याकडे असण्याचा

पण माझ्या नावातला आनंद

अजुन

तुला कमवता आला नाही


स्वप्न

रोज पुरून 

पुन्हा ऊकरून काढ रात्र

चांदण्या पसरवल्यात

त्यावर

समाधी म्हणून


आपण

आपलंच

आठवत राहतो

आपल्यासाठी

आणि नसतो

स्वार्थी

हे आजही पटत नाही


जाऊया 

कधी

तू सांग जसं जमेल

सोबत आलास

तर प्रेम

नाही…,

तर अपघाती म्रुत्युच्याही

होतात नोंदी.

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

गालिब