कागद तरंगतो पाण्यावर

नभीच्या अस्ताव्यस्त रेघांवर
आरपार रेषा उमटतील
येऊ तर दे दाटून
थेंबांचा समुद्र आकाशी

नसतं ते नवीन
धावून आसरा शोधतो
हिरवंगार काय काय होतं
एकदा विचार स्वतःशी

खिडकीच्या अलगद वरती
गोल थेंबांचा झरा
कागद तरंगतो पाण्यावर
मला सांगितलंय कुणी?

बोलायचंय का मातीबद्दल?
पाऊस कवितेत वाचलं असशील
अनुभव वेगळा होतो त्यांना
जे गेलेत मातीखाली

पहिलं प्रेम आठवून जातं
तुला आठवेन मी
वादळ उठुनही शांत
सोबत चहा अन भजी

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य