कलुषित पाणी

ज्यात काही अर्थ असेल असं सांग
देहबोली नि जीभ बदलत राहते

सूर्य उगवला, सूर्य मावळला...
घरातून निघ आणि परत घरी

पाहू नकोस तू दिनवण्या नजरेने
अशाने गरिबी कमी होत नसते

आमची जवाबदारी खांदे शोधते
'लाचारी'वर P.hd करशील का!

आगीने शिकवली जगण्याची चव
संहाराची ठिणगी तू शोधली कुठे?

पाण्याचा तुही न मीही पाण्याचा
हे कलुषित पाणी प्यावं कुणी?

मी एकदम साधा सरळ माणूस
लोकांनी लोकांचं काय ते पहावं.

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य