मृगजळ

परतून येतील दिन कसे पुन्हा
हा प्रश्न नि हा छंद, उरला जुना

विरला क्षण झोकात, कुठे बरसला
शोधतोय वास्तव कठोर, कसा हरवला

उणिवांचं नव्हतं काही, जीव जडला
काहीतरी मुद्दा हवाच चूक झाकायला

अंदाज चुकला कुठे, कुणी वर्तवला
गहन विचाराअंती मेंदू निवर्तला

थेंबांना कळला होता गोंधळ मनातला
सांभाळूनी खरच हा वादळ शमवला

राहू दे आग थोडी, उरात कहर हा
परतून येतील दिन मृगजळ असा उरला

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य