अहंकार

उतरून वाटेवरून
पसरत गेलेलं जग
पायाखालची जमीन
तिथेच ठेवून
माझं कोण कुठे आहे?
शोधत फिरतो

अनवाणी
अनोळखी
वाटा सांभाळून घेतात

तू दूर का?

मोहाचा आवाका
मिटत नाही...
पहिल्या पावसाची वाट
सांग, मी भिजू नको?

पूर्वेचं पश्चिमेला
सूर्य सांगतो सगळं
दृष्टी कवीची नसते त्याला!
आपल्याला भेटायचंय हे
ठरवावं लागेल लवकर

मनातलं, कुशीवर झोपून
सत्याचा प्रयोग स्वप्नात
हसणं मर्त्य एक
रात्रीचं स्मशान कार्य

वाटेवरचं एकट्याने बसणं
दु:सह्य होतं.
तुझ्या बोलावण्याचा आवाज येईल
बघ, तुझ्या घराबाहेरच बसलोय

पावसाची आठवण
परत सतत येते
मातीचं काय काय असते
नि तो, काय काय घडवून जातो.

शब्दांना अहंकार
जिभेनं सांगितला नसता तर...!

उम्मिदिला काही अर्थ असता ना!!!

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य