कारण

तू येतेस / येतोस
पण रुजत नाहीस आमच्यात.
पाणावलेले डोळे आमचे
आतल्या आतही वाहत असतात.
तुझं येण्याचं पण न थांबण्याचं कारण पिंजत बसतो,
नि आम्हीच पिसं पिसं होऊन जातो.

पुन्हा सावरत
नव्या उभारीनं,
...
आणि नकळत
उद्ध्वस्त होण्याचं कारण पुन्हा
आमचा पाठलाग करू लागतं.

इथे मात्र बुध्दाने सांगितलेली 'कारण' मीमांसा कामी येत नाही.

आम्ही तुझा पाठलाग करण्यात काय शिल्लक ठेवलंय
ह्याचा हिशोब पण पुसत नाही.
कदाचित आमचं स्वप्न उंची असेल!

तू येणार नाहीस? कि थांबणार नाहीस?
ह्या उत्तराचं नाही तर
प्रश्नपत्रिकेचा अभ्यास चोख असतो आमचा.

ह्या खेपेससुद्धा,
पुन्हा तुझ्या येण्याची, वाट पाहण्याची तयारी सुरु करतोय हळू हळू,
हळू हळू बघ तुही
जमलं तर रुज आमच्यात.

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य