भंगून स्वप्ने

भंगून स्वप्ने मोडली
शांती उशाशी... उदासी
जाणावी काय उरली
आस अपेक्षाभंगी.

उत्तरास दाखले कितीक
निरखावे कुणी
संदर्भी घोळ होतो
उमजतो तू काय ?

रोमियोचा खेळ केला
प्यादेच राजे होते
नगरास आटपाट
शापित दार होते

आतून कळ हि खोटी
न लागते जिव्हारी
उच्चारी कितीदा, अरेरे
ना भावनेस घोर

नजरेस लावा तोंड
शब्दात कळू दे मज
उघडझाप करती म्हणजे
मारावे कि पुरावे ?

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य