रूप

अस्वस्थता,
दारूण पराभवासारखी...
विलक्षण

खोलात
गहीरे
विवर...

मोक्ष...?
नसलेला माझा
तरीही, भोगतो...मला...!

पेरलेलं
ऊगवेल
असा तर्क चोख.

उजाडत
गेलेलं...
सर्वस्व शोध!

आरशात
धुसर प्रतिमा!
...दिसतात... खरंच?

मोकळं
जगण्याचं आकाश
बस..., बालपण शोधत...

पुटं
वाढवतात...
चेहरा शोभा?

माझं
गणित...
सोडवतं कोण?

उद्याही
जन्मेल,
पण, ऊगीच नाही...

रूप
नवंच...
अस्वस्थतेचं...

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य