शास्त्र

मी ठीकाण हलवतो
दर दोन दिवसांनी
काळ नि स्थळ सुद्धा 
एकसारखे राहत नाही म्हणत.
ब्लड प्रेषरचे ठोके, तसंच अंदाज
चुकण्यासाठी बांधलेले...
वरून सोबत असणारे सारेच, हृदयरोगतज्ञ
बाहेरूनच फुंकर घालतात, जीवात, जमेल तसं
ऐकेक प्रक्रीया पार पडत जाते...
शरीराचं वय तोवर कित्येक वर्ष पुढे निसटलेलं
आजची घालमेल संपवून, ऊद्याचं नवं त्रांगडं
गर्भगळित शरीरावर न लादून सांगणार कुणाला?
पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी
सगळंच इतकं त्रासदायक करून ठेवण्यामागचं शास्त्र
तूच मागितलस ना तुझ्या देवाला!

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य