दगड सम्राट

मला विखुरता येत नाही स्वतःला
रस्त्यांवरच्या धुळीसारखं,
दगडासारखा वाटेत पडून
हजारो पावलांना जखमा देत
रक्ताचा टिळा माथी सजवून
त्या लाथांचा मार खात आहे.
सवय अंगवळणी पडलीय
सवाल तसाच दारात उभा
निर्लज्जपणाही निर्ढावून सुस्त
लाजत नाही देहपण आता
माती होऊन विखुरेपर्यंत
का असेच आशीर्वाद घेत राहू
कि उठून एक क्षणासाठी
रणभूमीचा 'सम्राट' होऊ!



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य