गर्दी

कधीच विचार नव्हता केला
कोण सोबत आहे माझ्या,
कोण माझ्या विरोधात…!
त्या काफिल्याला आपलं मानून
त्यात सामावून गेल्यावर
तिथल्या गर्दीने अचानकच
बाह्यांगावर एकही जखम न करता
हृदय छातीतून विलग करत
काळीजही तिथून खेचून काढलं
हातांवरच्या रेषांनाही रस्ते समजून
ती गर्दी मला तुडवत गेली…
आणि गळण्यासाठी काहीच बाकी नसलेल्या
त्या प्रचंड वृक्षाच्या सावलीत विसावा घेत
मी विचार करतोय…
'परतणाऱ्या गर्दीसोबत पुन्हा मागे फिरावं'
 

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य