अजून

एक बहर सरू दे अजून
राहू दे अंतर तुझ्या माझ्यात
आता गाठावी जवळीक कशाला
स्पर्शावरही होईल आघात

एक खंत करू दे अजून
राहू दे दुरावा तुझ्या माझ्यात
बंध संबंध असंबंध आता
कशास गुंफावे हातात हात

एक थेंब वाहू दे अजून
राहू दे गफलत तुझ्या माझ्यात
आठवून विसरलो आठवणी सगळ्या
तुही पुरावे जाळून टाक

एक सुर्य जळू दे अजून
राहू दे अंधार तुझ्या माझ्यात
माझ्या सावलीत अधिक असतो
तुझ्या अंगाचा अंधार…

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य