काय वेगळं काही…


आवरून घे स्वतःला सकाळ होण्यापूर्वी
कुठेतरी मोकळं होऊन उन, वारा, पाऊस काहीतरी
नाहीच तर रोजची खरडेघाशी…
आणि जीवन म्हणजे काय वेगळं काही?

हातात उरलेला मळ, तोंडात फसलेला गळ!

इथून तिथून माणसं आरपार फिरत जातात
मन तर तसही अदृश्य,
वरून जबरदस्ती नसतेच की समजून घे मला
व्यवहार तरीही होतोच खरेदी - विक्रीचा
आणि जग-रहाटी म्हणजे काय वेगळं काही?

विरह…, न मिळालेल्या सर्व इच्छांचा
'तू जवळ नसावी' ही पण असेल,
'अडचण' पण काही चीज असावी
की इथे सांगू शकत नाही अशी सुद्धा…!
तरीही असणं - नसणं म्हणजे काय वेगळं काही?

ठरलाच तर मोह, उरलाच तर डोह…!

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य