न्यायालय

त्यांना फिरून यायचं नसते माघारी
उलट, जिथे ते सुटलंय ते आठवतही नसतं
आठवलं तरी ते नको असल्याच्या खुणा
चेहऱ्यावर तू 'नाही' म्हणालीस तरी जाणवतात मला
खोलात मन फिरून येतं, अन ती वेळ आठवून
कुणाला दोष द्यावा ह्याचा पंचनामा करतं… तर
सारेच दोषी आढळतात ?
आणि जिथे सारेच दोषी असतात
त्याला न्यायालय नाही म्हणत…!
तारखेचं महत्व तेव्हा पटू लागतं
जेवढ्या त्या जास्त, तेवढी आठवण धुसर झाल्याचं
कारण आयतं सापडतं…, केव्हाही काढता पाय घेता येतो.
हां, तसं म्हणायला रात्री झोपण्यापूर्वी
एकवार तरी आठवत असेल की पुन्हा असे होणे नाही
तो विचार आणि खोलवर रुजू लागतो
दोषी न्यायालयात फाशीची शिक्षा निश्चित केली जाते…!

- २८-२-२०१३ 

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य