अबोल…

नको म्हणतात शब्द

असेल नजर तर दिसेल अर्थ

मी ऐकतो तु सांग म्हणतांना

झोपी जातात शब्द


पुन्हा कोण बोलणार?

दोघेही ठरवतात, नाही बोलायचं

… वेळ जातेय निघून

आतुर शब्द धुसर


ही रोजच्या गणिताची सवय

जमतंय सर्व पण भीती सर्वत्र

हे सुटलं कोडं…

तर थांबेल प्रवास?


संथ सोबत, तरी संपते साथ

अबोल शब्द हवेत विरतात

प्रवास सुरू अनंत हवा

श्वास शब्द बनु शकतात?

Comments

Popular posts from this blog

मनाची सुधारीत आवृत्ती

काळीज खुणा

हृदयास छंद जळण्याचा