वेड्यांच्याच देशात राहिलास तू

वेड्यांच्याच देशात राहिलास तू

निघायचं म्हणून निघालास
आधुनिक जगात राहूनही
पोहोचायचं कुठे हे
तू ठरवू नाही शकलास!

शाळेत एकाच बाकावर
वा मागे पुढे बसून
यथेच्छ मार खाऊन
जमलं तेवढा अभ्यास करून
जगण्याची किमान आशा
पल्लवित ठेऊ शकलो
इथवर समाधान.

पुढे सर्व एक साची जगणं...

बुद्धीच्या कुवतीनुसार
वा जातीनुसार परंपरागत...

बदल कशात झाला
हे मात्र
खूप साऱ्या घटना आठवल्यावर
...
'वय' ह्या शब्दापाशी येऊन थांबतो

अकलेचे तारे तोडण्यात
अर्धमग्न मनाचं पूर्ण योगदान
जमेची बाजू धरत
अल्पसंतुष्टी लादतो
आमच्या पुढच्या पिढीवर

रिकामा वेळ...?

वाचन, मंथन, मनन...
किंवा परवा परवाचं शिक्षण
बुद्धी देऊन गेल्याचं
दाखव कृतीत उतरवून...!

जंगलात नाही राहत आपण
ह्याचं किमान भान ठेव
नि आपण काहीच बदलू शकत नाही
तर निदान उद्ध्वस्त करण्याचा
विचारही डोकावू देऊ नको...

मेंदू फार मोठी चीज आहे
समजायचं वय सरलंय,
आणि मानेवर मिरवून फिरलं
तरी...
वेड्यांच्याच देशात राहिलास तू...
मित्रा...!!!

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य