पूर्णविराम

नाही थांबत मन
मरेल एक वेळ

इथे पूर्णविराम हवाय.

तुझे विचार कुठवर पोहोचलेत

तपासत राहा

स्थितप्रद्न्य राहण्यापेक्षा
किमान
बदललेलं बरं

नंतर नंतर तर कुणी
विचारत देखील नाही
मग शब्दांचे फेर कितीही धर

वृद्ध मनसुद्धा
विचार करते...
त्या आधीचं बाकी सारं
आलंच आहे...
नि जन्मत राहिल

काना कोपऱ्यातील कोळी
जाळं विणून वाट बघतोय
"हा सुद्धा त्यात सापडला तर..."
अर्थात तुला खाणार नसला तरी
विचार करतच असेल ना तो?

पाटी कोरी राहते कधी कधी
नि मग त्यावर उमटलेल्या
कधी काळच्या रेघा
अलगद दिसू लागतात

चूकसुद्धा
विचार करून
कृतीत उतरवता येते

कशाला कुणाचं भलं करावं?
हा मग सुविचार होतो.

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य