तुला कळतंय

असाही तोटा नाही अाठवणींचा माझ्याकडे
पाऊस कधीही नी मोरही वेळी अवेळी नाचतात
मराठी कळतंय तुला, असं मानते मी
प्रेमाची एकच एक भाषा नसते म्हणून
तोफेचा गोळाही बाजुला पडो येऊन..., मरो तो.
नाही वाटत भीती.
समुद्र खवळतो पोट भरूनही,
ह्यात काहीतरी रहस्य आहे!
आरशात समोरची 'मी' हसते
तरीही हरवते ते स्मीत शोधत...
कि हरवतेय मी कुणास...?
तुला कळतंय...,
हे मात्र उमगत नाहीयं मला?
सांगायलाच हवं का तुला...
देखावेही आजकाल जमू लागलेयत मला!

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य