उगवल्याचं दु:ख

उगवल्याचं दु:ख सूर्यालाही असू शकतं
अंधार पसरवणार्यांचं 'ते' जग न्याहाळल्यावर

कोपरा न् कोपरा मी नाही उजळवू शकत
लपण्यासाठी जग, सांग... कसं कमी पडतं?

शुर तुझा तुच! जिंकते तुला कोण?
कवट्यांच्या कुंड्या, असा वाटेत पेरत चालतोस!

प्रेमच जर नसतं, धरणी फिरली असती?
फिरलीत किती माथी, हे प्रेमालापण कळतं

इतकी अाग अंगी, असा शांत मी अनंत
ठीणगी भस्म करते, असा धर्म तुझा कोण?

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य