अवती भोवती माझ्या

तुझ्या हसण्यात कोडे असते नेहमीच
तु सांगशील…, पण खोटं, हे ही मी जाणतो
अवती भोवती माझ्या, तु रुतलेली असतेस केव्हाही
पण तुला नको असलेल्या आणि हव्या असलेल्या गोष्टी
तु एकाच पानावर लिहितेस…
गोंधळ दोघांचाही होतो…!
'मला तु हवीय', मी अर्थ लावतो
'तु नकोस मला', तु अर्थ लावते...
अवती भोवती माझ्या, तु रुतलेली असतेस तेव्हाही…!

Comments

Popular posts from this blog

काळीज खुणा

मनाची सुधारीत आवृत्ती

गहराई