फरक

एक नशीबवान दगड
रस्त्यात आडवा पडून
शेन्दराने माखुन सुखेनैव जगायचा
आणि माझ्यासारखा तू उगीचच
गफलत करून घ्यायचा
दगडात अन देवात
का कुणास ठाऊक ?
अजूनही तुला फरक कळलेला नाही
देवा - दगडाचा…?
ऐक पुन्हा सांगतो,
'दगड देव नसतात
देव दगडाचेच असतात !'

Comments

Popular posts from this blog

मनाची सुधारीत आवृत्ती

रहस्य

नोंद