भीक

प्रेम त्याग मागतं,
प्रेम बलिदान मागतं,
प्रेम सहवास मागतं,
प्रेम स्पर्श मागतं,
प्रेम आठवण मागतं,
प्रेम ... मागतं,
हळू हळू प्रेम
सगळंच मागत जातं...
आणि मग कळतं,
प्रेम भीकही मागतं !
फक्त पसरवत नाही हात कुणासमोर
कारण ते कुणीही छाटून टाकेल !
म्हणून भावनेच्या आहारी हृदय बांधून
प्रेम 'भावनिक भीक' मागतं !

Comments

Popular posts from this blog

काळीज खुणा

मनाची सुधारीत आवृत्ती

गहराई