नितळ, स्वच्छ मनाची माणसं


ओठांच्या कडेवर आणून
शब्दातला अक्षर न अक्षर
ढकलून द्यावा कुणाच्या कानी...
कान तसाच निःस्तब्ध,
कान ल्यालेल्या चेहेर्याचा भाव
जणू जन्मापासूनच 'बहिरा'
डोळ्यांचा रंग गंजल्यासारखा लाल
सुजलेले गाल, जणू रागाने
कुठल्याशा भावनांनी ओथंबलेला चेहेरा
अगदी 'निरागस' नकोस वाटतो.
शब्दांची हत्या केल्याचं  पातक
मी मग मान्य करतो...
अन 'सक्तमजुरी' लाभून
तुरुंगात असल्यासारखा
घरातल्या खिडकीच्या गजांमधून
जाईल तिथवर नजर टाकत
'नितळ, स्वच्छ मनाची माणसं'
शोधल्याची चूक म्हणून
स्वप्नांचं दळण रोज दळतो...
आता नितळ, स्वच्छ मनाची माणसं
स्वप्नातच वावरतात...

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य